सध्या अनेक लोकप्रिय सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकत आहेत. आता चर्चा आहे ती म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी हिची. नुकतीच ती विवाहबंधनात अडकली असून तिने आपल्या इन्स्टाग्राम प्रॉफाईलवरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Mostly Sane: सध्या अनेक लोकप्रिय सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकत आहेत. आता चर्चा आहे ती म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी हिची. नुकतीच ती विवाहबंधनात अडकली असून तिने आपल्या इन्स्टाग्राम प्रॉफाईलवरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या मेहेंदी, हळदी आणि संगीतचे फोटो हे व्हायरल होत होते. आता अखेर ती विवाहबंधनात अडकली असून २५ फेब्रुवारी रोजी तिचा विवाह संपन्न झाला.
लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळी हिची बरीच चर्चा असते. २०१५ पासून ती युट्यूबवर चांगलीच लोकप्रिय असून गेल्या १० वर्षांत तिची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. २५ फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल तिचा विवाहसोहळा संपन्न झाला.महाराष्ट्राची कन्या आता नेपाळची सून झाली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्नगाठ बांंधली आहे. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. ते दोघं लग्न कधी करणार? याचीही बरीच चर्चा होती तर आता अखेर ते दोघं लग्नबंधनात अडकले आहेत.
प्रसिद्ध युट्यूबवर प्राजक्ता ‘मोस्टली सेन’ या नावाने ती ओळखली जाते. प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर यश मिळवल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. तिला नेटफ्लिक्सची सीरिज ‘मिसमॅच्ड’मध्ये डिंपल आहुजा ही भूमिका मिळाली. तिने साकारलेली ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळाली. ही सीरिजही खूप गाजली. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. या सीरिजमध्ये रोहित सराफ, रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, तारुक रैना हे कलाकार आहेत. अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता लेखिकादेखील झाली आहे. नुकतंच तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता लेखिकादेखील झाली आहे.प्राजक्ता अभिनेत्री नव्हती, त्याआधीपासून ती व वृषांक एकत्र आहेत. वृषांक हा काठमांडू, नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्याची प्राजक्ताशी ओळख झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते. इथेच वृषांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं, त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले.प्राजक्ताने लग्नाची तारीख २५-०२-२०२५ ही तारीख कॅप्शनमध्ये लिहून फोटो पोस्ट केले आहेत. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे विवाहबंधनात अडकत असून नुकताच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचेही लग्न पार पडले आहे. तिनेही १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली.