spot_img
spot_img

Latest Posts

रामचरण आणि त्याच्या पत्नीने लाडक्या लेकीसोबत पूर्ण केलं पहिलं वरलक्ष्मी व्रत, पाहा काही फोटोज…

राम चरण (Ram Charan) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि एक उद्योजक आहे जो प्रामुख्याने तेलुगु चित्रपट (Telugu movies) उद्योगात काम करतो.

राम चरण (Ram Charan) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि एक उद्योजक आहे जो प्रामुख्याने तेलुगु चित्रपट (Telugu movies) उद्योगात काम करतो. २००७ मध्‍ये चिरुथा मधून अभिनय पदार्पण करणारा राम चरण द फायटर, मगधीरा , राचा आणि नायक यांसारख्या अनेक प्रशंसित चित्रपटांचा भाग आहे .अभिनेता असण्याव्यतिरिक्त, राम चरण, त्याचे वडील, चिरंजीवीच्या १५० व्या चित्रपटाचे निर्माता देखील बनले आणि त्यांनी कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी नावाच्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली. नुकतेच या वर्षी जून महिन्यात राम चरण याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.

RRR फेम अभिनेता रामचरणच्या घरात या वर्षी जून महिन्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी त्यांच्या मुलीचं नाव क्लीन कारा असं ठेवलंय. चिमुकल्या क्लिन कारासोबत उपासनाने तिचा पहिला वरलक्ष्मी व्रत केला आहे.
उपसनाने सोशल मीडियावर वरलक्ष्मी व्रतचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती मुलीला घेऊन बसल्याचं पहायला मिळत आहे. तर तिच्या बाजूला वरलक्ष्मी व्रतासाठी देवीची मांडणी केल्याचं दिसून येत आहे. क्लिन कारा ही आता दोन महिन्यांची झाली आहे.
‘मी यापेक्षा अधिक काहीच मागू शकत नाही. क्लिन कारासोबत माझासुद्धा पहिला वरलक्ष्मी व्रत’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. हाच फोटो रामचरणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
उपासना आणि रामचरणने २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर उपासनाने मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी क्लिन कारा असं ठेवलं. एका देवीच्या नावावरून हे नाव ठेवल्याचं रामचरणने स्पष्ट केलं.
दक्षिण भारतात वरलक्ष्मी व्रताचं खूप महत्त्व आहे. लग्न झालेल्या हिंदू महिला ही पूजा करतात. यामध्ये देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. वरलक्ष्मी व्रतालाच वरलक्ष्मी पूजा असंही म्हटलं जातं.

हे ही वाचा: 

शरद पवारांनी केला गंभीर आरोप, मुंबईच्या सूचनेनंतर पोलिसांची लाठीचार्ज…

शशांक केतकरचा एक मोठा आरोप, प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने थकवले पैसे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss