राम चरण तेजा हा तेलगू चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता आहे. त्याच्या तेलगू भाषेतील अनेक चित्रपटांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राम चरण याची पत्नी उपासना हिला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्ब्ल ११ वर्षेनंतर त्याच्या घरी आनंद आला आहे. ‘आरआरआर’ फेम अभिनेता राम चरण याचे चाहत्यांकडून अभिनंद होत आहे. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाले आहे. आज सकाळी त्याने दादर मधील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गणपती बाप्पा आणि राम चरण यांचे खास नाते आहे. मुलीच्या जन्मानंतर त्याने पुन्हा एकदा अयप्पा दीक्षेचं पालन केले आहे.




