spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने नव्या वर्षात केली आव्हानात्मक सुरुवात, पायलट लुक चे फोटो होतायत व्हायरल…

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे. त्यासाठी ती नवनवीन आव्हान स्वीकारत आहे.

अभिनय क्षेत्रात तिने स्वतःचा जम बसवला आहे, मात्र आता सई पायलट होण्याचं प्रशिक्षण घेत आहे. नव्या वर्षाची सुरुवात करत सई नव्या करिअरसाठी प्रशिक्षणाची आव्हानात्मक सुरुवात करत असून जिद्दीनं प्रसिक्षण पूर्ण करणार असल्याचंही तिनं सांगितलं.
सई कायमचा वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आली आहे, पण आता ती अभिनयाच्या पलीकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे.
नव्या वर्षाची सुरुवात सईने अगदी हटके केली आहे. अडवेंचर (Adventure) करत सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई हे खास शिक्षण घेत आहे.
हिंदी इंडस्ट्रीत सध्या सई जोरदार काम करताना दिसत असली तरीही सई प्रत्येक आव्हान जिद्दीने पूर्ण करत आली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सईला पायलट का व्हावंस वाटलं? याबद्दल स्वतः सई सांगते आहे.
सई ताम्हणकर म्हणाली की, कामशेत टेम्पल पायलट स्कूल मधून मी माझा पायलट कोर्सच प्रशिक्षण घेतलं आणि ही एक अशी शाळा आहे जिकडे कौशल्यपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात. भारतातली सगळ्यात हि बसत स्कुल आहे आणि मला खूप वर्ष असं वाटतं होत आपण नवीन शिकलं पाहिजे. आपण आपल्या धावपळीच्या जीवनात गुंतलेलो असतो त्यामुळे आपल्या अनेक गोष्टी शिकायच्या राहून जातात, आणि काहीतरी नवीन शिकायचं म्हटलं कि मी हे करू शकेन का? मला हे जमेल का? असे प्रश्न उद्भवतात. मग अडवेंचेर स्पोर्ट्स हे आपल्याला जमतं म्हणून पायलट होण्याचा विचार मनात आला. या आधी मी स्कायडायव्हिंग केलं आहे, मग पॅराग्लायडिंग शिकायला काय हरकत आहे हा विचार मनात ठेऊन पॅराग्लायडिंगचा कोर्स करायचा ठरवलं.

 

Latest Posts

Don't Miss