Sunday, May 28, 2023

Latest Posts

जगामधील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर साराची एन्ट्री

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान हिने जगामधील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. तेथे ती प्रचंड सुंदर अशा लुक मध्ये दिसत होती त्या कार्यक्रमाचे फोटो साराने तिच्या सोशल मीडिया पेज वर टाकले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने जगामधील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे. १८ मे रोजी साराने या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुंदर काळ्या गाऊनमध्ये स्वतःचे पोस्ट शेयर केले आहेत.
साराने त्या पोस्ट खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे “फ्रान्स माझ्यासाठी सर्व काळातील सर्व राष्ट्रांच्या रोमान्समधील नायिका आहे.” – लेफ्टनंट विल्यम आर्थर सिरमन. साराने तिचा लुकनुसार मेकअप केला आहे आणि तिचा क्लासी पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
सारा अली खानने फ्रेंच रिव्हिएरामधील आणखी एक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसोबत व्हॅनिटी फेअरच्या वार्षिक कान्स फिल्म फेस्टिव्हल पार्टीला हजेरी लावली.
या कार्यक्रमासाठी साराने सुदर असा सिल्वर चमकणारा गाऊन घातला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिली आहे की “स्पॅमसाठी माफ करा, खूप ग्लॅम वाटले, हे स्वच्छ पाणी पाहून- सारा जवळजवळ पोहत होती, परंतु नंतर विरुद्ध निर्णय घेतला . ते- फक्त माझ्या माय ग्लॅम फॅमिलीसाठी.
साराने तिच्या तिसऱ्या लुकसाठी अबू जानी संदीप खोसला या डिझायनरचा ड्रेस परिधान केला आहे. या कार्यक्रमामध्ये सारा चाहत्यांना तिच्या आजीच्या ६० च्या दशकात घेऊन गेली. या लूकमध्ये साराने तिचे केस आणि मेकअप विंटेज करून चाहत्यांना बॉलीवूड वाइब्सने घायाळ केले आहे.
साराचा नवा चित्रपट जरा हटके जरा बचके हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सारा अभिनेता विकी कौशल सोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss