भारतात आता स्मार्ट फोनचे मार्केट बदलणार आहे. भारतातील ग्राहक आता प्रीमियम स्मार्टफोनकडे वळत आहे असा मार्केट रिसर्च फर्म काउंटरपाईट टेकनॉलॉजीच्या अहवालानुसार अशी माहिती आहे.
भारतालाही मोठी बाजारपेठ मिळत आहे. ॲपल आणि सॅमसंग यांच्या प्रीमियम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे, भारतीय स्मार्टफोन बाजाराची व्याप्ती वाढत आहे.
२०२५ पर्यंत ४ लाख २८ हजार ९०० कोटी रुपये पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. अॅपल आणि सॅमसंग सारखे बैंड प्रीमियम आणि अल्ट्रा-प्रिमियम विभागांमध्ये स्पर्धात्मक उत्पादने देत आहेत. यामुळे मार्केटमध्ये बदल होत आहे.
प्रीमियम फोन्सकडे वाढत्या कलामुळे, भारतीय स्मार्टफोन बाजाराची सरासरी किरकोळ विक्री किंमत या वर्षी पहिल्यांदाच अंदाजे २५,७०० रुपयेच्या वर जाऊ शकते.
२००१ मध्ये भारतीय स्मार्टफोनचे मार्केट ३१.९ अरब डॉलर होते. २०२३-२४ मध्ये अॅपलने भारतात भारतातील मोबाईल फोन व्यवसायातून एकूण ६७,१२९.६ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर सॅमसंगने ७९, १५७.६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
अहवालानुसार, स्थानिक उत्पादन आणि आयफोन उत्पादनांच्या काही दिवसापूर्वी झालेल्या किंमतीतील कपातीमुळे, Apple ला त्यांच्या ‘प्रो-सिरीज’साठी जोरदार मागणी अपेक्षित आहे. दरम्यान, आता सॅमसंगच्या प्राइज सेंट्रींक धोरणाला गती मिळत आहे.