spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

एकावे ते नवलच!, इराणी लोक चिकन, मटणपेक्षाही एक असा प्राणी ज्याचे मांस मोठ्या उत्साहाने खातात…

इराण (पर्शियन‎) किंवा इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण हा पश्चिम आशियातील एक देश आहे . १९३५ पर्यंत ते पर्शिया म्हणूनही ओळखले जात होते. इराण हा देश जगातील सर्वाधिक मांसाहार खाणारा देश आहे. पण त्यांच्या आवडीचे मांस चिकन किंवा मटण नाही तर या प्राण्यांचे मांस आवडीने खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृती मध्ये भात, मांस, भाज्या आणि मसाल्यांचा समावेश असतो. जर आपल्या देशात मांसाहार करणाऱ्या लोकांना विचारलं की मांसाहारात तुम्हाला काय खायला आवडेल तेव्हा अनेक लोक हे चिकन, मटण किंवा मासे असे उत्तर देतील. पण तुम्हाला माहिती आहे का? की इराण हा असा देश आहे जो सर्वांत जास्त मांसाहार खातो. आणि त्यातही या देशाची मांसाहाराबद्दलची पसंती जरा वेगळीच आहे.

१) इराण हा असा देश आहे जो जगातील काही इस्लामिक देशांपैकी एक आहे. जिथे मांसाचे सेवन सर्वाधिक केले जाते. मुळात इराणमधले लोक कोणत्याही प्रकारचे प्राण्यांचे मांस खातात.
२) बहुतेक मुस्लिम देशांमध्ये चिकन, मटण, गोमांस याशिवाय इतर अनेक प्राण्यांचे मांस खाल्ले जाते.
३) इराण हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे इराणमध्ये सुमारे ९५ टक्के लोक शिया मुस्लिम हे आहेत.
४) पण या देशामध्ये जास्त पसंती चिकन, मटण किंवा गोमांस या व्यतिरिक्त खाल्ले जाणारे मांस वेगळे आहे. इराण मधील अनेक लोक हे एका अश्या प्राण्यांचे मांस अगदी उत्साहाने खातात. तो प्राणी म्हणजे मेंढी.
५) इराणमध्ये लोक मेंढ्याचे मांस भरपूर खातात.
६) तसेच इराणमध्ये मेंढी प्रमाणे बदकाचे मांसही इथे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृती मध्ये अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.
७) इराणी खाद्यपदार्थात मुख्य म्हणजे भात आणि मांस, तसेच भाज्या, दाणे यांचे मिश्रण असतं. तसेच त्यांच्या मसाल्यामध्ये नेहमी कोरड्या वनस्पती, फळे यांचा समावेश केला जातो. डाळिंब, दालचिनी, पार्सेली या भाज्या आणि फळे वापरली जातात. एवढचं नाही तर सुके लिंबू, केशर आणि इतर थोडेसे आंबट चवीचे पदार्थ, दालचिनी यांचा सढळ वापर इराणी स्वयंपाकात देखील केला जातो.
८) प्रत्येक देशामधील खाद्यसंस्कृती ही नक्कीच वेगळी असते. ती त्यांच्या संस्कृत, पद्धतीने आणि त्यांच्या परंपरेनेच पुढे चालत आलेली असते.

 

 

Latest Posts

Don't Miss