Thursday, March 28, 2024

Latest Posts

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात

नुकताच पार पडलेला इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा हा सिझन दमदार ठरला. आयपीएल २०२३ चे जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने पटकावले. नुकताच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडचा विवाहसोहळा पार पडला. ३ जून रोजी ऋतुराज आणि उत्कर्षा या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि या दोघांचे लग्नाचे फोटो शोधलं मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत.

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची बऱ्याच दिवसपासूनची मैत्रीण उत्कर्षा पवारसोबत ३ जून रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत.
ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्स २०२३ चे विजेतेपद जिंकवण्यात मोलाचा वाटा आहे. आयपीएल २०२३ चा सिझन समाप्तीनंतर सलामी फलंदाज जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघात सामील होणार होता.
ऋतुराज गायकवाड प्रमाणे उत्कर्षा पवार देखील महाराष्ट्राची क्रिकेटपटू आहे. अहमदाबादच्या सीएसकेच्या जेतेपदाच्या सेलिब्रेशनमध्ये नुकतेच चाहत्यांनी ऋतुराजसोबत मैदानात पाहिले.
ऋतुराज गायकवाड च्या पार पडलेल्या लग्न सोहळ्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे शिवम दुबे आणि प्रशांत सोलंकी यांचा समावेश होता. त्याचबरोबर शिखर धवन, राशिद खान, श्रेयस अय्यर आणि उमरान मलिक यासारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी ऋतुराजला सोशल मीडियावर शुभेच्छा दिला.
इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाड एक स्टार होता. त्याने चेन्नईच्या संघाला प्रत्येक सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे. त्याचा सलामीवीर सहकारी डेव्हन कॉनवेसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss