spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

राजा राणीची जोडी अडकली लग्नबंधनात! ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने लावली हजेरी

मराठी टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे त्यांच्या फॅन्सना सोनार आणि अंबरच लग्न कधी होणार याची उत्सुकता लागली होती.

 

ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत सोहळा असे सगळे विधी पार पडल्यावर शिवानी-अंबरने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.
शिवानी-अंबरने गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला होता. यानंतर दोघांचेही चाहते ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याची आतुरतेने वाट पाहत होते.
लग्नसोहळ्यातील विधींसाठी शिवानी सोनारने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर लाल रंगाचा शेला आणि पारंपरिक दागिने असा लूक केला होता. तर मोती रंगाचा कुर्ता, त्यावर लाल रंगाचे उपर्ण आणि हिरवे धोतर असा लूक अंबरने केला.तर शिवानीने वरमाला विधीसाठी दाक्षिणात्य लूकला पसंती दिली. अंबरने सफेद रंगाची बारीक नक्षीकाम असणारी वर्क असणारा इंडोवेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.
अंबर आणि शिवानी यांच्या लग्नाचा खास हॅशॅटग म्हणजेच #AmbaNi देखील या पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे. तसेच अंबर-शिवानीच्या लग्नात त्याच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील बरीचशी मंडळी उपस्थित होती. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी, ‘आमच्या कुटुंबात तुझे स्वागत सुनबाई’, असे म्हणत शिवानीचे खास स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पृहा जोशी, रुमानी खरे, रेश्मा शिंदे, अनघा अतुल, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे दिग्दर्शक, शुभांगी गोखले, श्रीकांत यादव, सुमीत पुसावळे व त्याची पत्नी असे सगळे सेलिब्रिटी या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित होते. तसेच या टीमने नवरा-नवरीसह यावेळी छानसा सेल्फी सुद्धा काढला.
अंबर आणि शिवानी यांच्या लग्नाचा खास हॅशॅटग म्हणजेच ‘#AmbAni Wedding’ देखील या पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे. तसेच अंबर-शिवानीच्या लग्नात त्याच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील बरीचशी मंडळी उपस्थित होती. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी, ‘आमच्या कुटुंबात तुझे स्वागत सुनबाई’, असे म्हणत शिवानीचे खास स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Latest Posts

Don't Miss