spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो

Shivani Sonar & Ambar Ganpule : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी सोनार व अंबर गणपुळे यांचं केलं केळवण, पाहा फोटोस

शिवानी आणि अंबर यांचा साखरपुडा गेल्यावर्षी गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर पार पडला असला तरीही या जोडीचं लग्न कधी होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
शिवानी आणि अंबर यांच्या लग्नाआधी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने यांच केळवण केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सर्वांचा निरोपघेतला असला तरीही या मालिकेतले सर्व कलाकार एकमेकांच्या संपर्कात असताना दिसत आहेत.
अंबर-शिवानी जोडप्याचं केळवण एका हॉटेलमध्ये केलं. यासाठी संपूर्ण फुलांची सजावट करून केळीच्या पानावर ‘शिवानी-अंबरचं केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं.
या केळवणादरम्यान शिवानीने प्लेन गोल्डन साडी आणि त्यावर सोनेरी झुमके वेयर केले होते तर अंबरने काळ्या रंगाचा प्लेन पठाणी शर्ट वेयर केला होता.
अंबर-शिवानी यांच्या केळवनात हे दोघेही नॉन-व्हेजवर ताव मारताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच या सगळ्या कलाकारांनी मिळून अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण केलं होतं. मात्र आता याच टीम ने ‘शिवानी-अंबरचं केळवण’ करत फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे
केळवण पार पडल्यावर आता दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होऊन लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

Latest Posts

Don't Miss