spot_img
spot_img

Latest Posts

आज भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित जाणून घ्या काही खास गोष्टी…

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. २०१४ साली पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विकासाच्या मार्गानी वाटचाल करायला सुरुवात केली. अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीकडे वाटचाल सुरु केली. तर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या आधी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गेल्या नऊ वर्षपासून ते भारताचे पंतप्रधान आहेत. आज त्याचा वाढदिवस असल्यामुळे जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरात मधील एका छोट्याशा गावात झाला आहे. गरीब पण प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले.
२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
२०१४ मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर विकासाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. देशाच्या नागरिकांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत.
२ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले, जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक लोक चळवळ ठरली आहे. या अभियानाची व्याप्ती आणि प्रभाव ऐतिहासिक आहे.
जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. ऑगस्ट 2015 मध्ये भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाचे नेते या परिषदेत उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss