Sunday, May 28, 2023

Latest Posts

२०२३ मध्ये बॉलीवूडमधील छप्परफाड कमाई केलेले चित्रपट

या वर्षांमध्ये अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाले. काही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काही चित्रपट रिलीज होताच चित्रपटगृहांमधून उतरले. यामधील काही हिट चित्रपटांनी किती कमाई केली आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बरेच दिवस बॉलीवूडला प्रेक्षकांनी बॉयकोट केले होते. परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

किंग खानचा आलेला पठाण (Pathan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तगडी कामे केली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि अनेक नामवंत कलाकारांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला होता. या चित्रपटाने १,०५० करोड ची कमाई केली आहे.
श्रद्धा कपूर आणि रणवीर कपूरचा नुकताच एक चित्रपट तू झुठी में मक्कार (Tu Jhuthi Mein Makkar) हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाने २२०.१० करोड रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले.
सलमान खानचा बिग बजेट चित्रपट किसी का भाई किसी कि जान (Kisi ka bhai kisi ki jaan) या चित्रपटाला सुरुवातीला प्रेक्षकांनी नामपसंती केली परंतु त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाने १७९.०९ करोडची कमाई बॉक्स ऑफिस केली आहे.
बॉलीवूडचा सिंघम अजून देवगणचा भोला ( Bhola) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीस वर १११.६४ करोडची तगडी कामे केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा मराठी चित्रपट वेड (Ved) या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. हे दोघे कपल सोबत बऱ्याच वर्षानंतर मोठ्या स्क्रिन वर दिसले आणि त्यांच्या चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला.
अजय देवगनचा नवा चित्रपट दृष्यम २ (Drishyam 2) या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दाखवली. या वर्षांमध्ये अजय देवगनचा हा दुसरा हिट चित्रपट आहे. या चित्रपटाने २३९.०१ करोडची कमाई केली.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss