श्रावणातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी श्री कृष्णाची पुजा केली जाते. यंदाच्या वर्षी कृष्णजमाष्टमी २ दिवस असणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये कृष्णजमाष्टमीला खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी कृष्णाला नैवेद्यमध्ये सुंठवडा, आणि गोपाळकाला हा नैवेद्य दाखवला जातो. शुभ मुहूर्तावर बालगोपाळाची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात असा लोकांमध्ये विश्वास आहे.