Valentine Day 2025 : 90 च्या दशकात आलेल्या चित्रपटांची गाणी एव्हरग्रीन गाणी म्हणून ओळखली जातात. त्यातच आता ‘व्हेंलेंटाईन डे’ वीक सुरु आहे आणि लवकरच येणारा ‘व्हेंलेंटाईन डे’, तर अनेकांनी आपल्या जोडीदारासह हा खास दिवस साजरा करण्याचे प्लानिंग केले आहे. 90 च्या दशकात आलेल्या चित्रपटांची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. ही काही खास गाणी तुमच्यासाठी. ही गाणी तुमच्या जोडीदारासाठीदेखील तुम्ही डेडिकेट करू शकता.
पहला नशा, पहला खुमार
या ‘व्हेंलेंटाईन डे’ ला तुम्ही १९९२ मध्ये प्रदर्शित मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील गाणी सुपरहिट असून ‘पहला नशा, पहला खुमार’ हे गाणं नक्कीच निवडु शकता. हे गाणं तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीस डेडिकेट करू शकता.
चाँद से परदा किजीये
कुमार सानू यांनी गायलेले आओ प्यार करे या चित्रपटातील चाँद से परदा किजीये हें रोमँटिक सॉंग श्याम राज यांनी लिहिले आहे. संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे तर या गाणे सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिका निभावली आहे.
सोचेंगे तुम्हे प्यार करते नहीं …
दिवाना याच चित्रपटातील हे एव्हरग्रीन गाणे आजही लोकप्रिय आहे. ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या गीताला कुमार शानू यांनी गायले. तर, नदीम-श्रवण यांनी संगीत दिले. समीर यांनी या गीताचे लेखन केले होते.
दिल परदेसी हो गया
दिल परदेसी हो गया हा सावन कुमार टाक दिग्दर्शित 2003 चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. हे गाणं कच्चे धागे या चित्रपटातील असून लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलं आहे.
‘एक दिन आप यूं हमसे’
1997 मध्ये आलेल्या ‘यस बॉस’ चित्रपटातील हे गाणे शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायले आहे तर त्याचे संगीत जतिन-ललित यांनी दिले आहे.