बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. या हत्याप्रकरणाने राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. हत्याप्रकरणी आता पर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी पोलीस कोठडीत आहे आणि त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यालाही अटक केली आहे. वाल्मिक कराड याला १५ दिवसांची आणि सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर वाल्मिक कराड मात्र, आता वाल्मिक कराडचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे वाल्मिक कराडवर आरोप करणारे आमदारांचे फोटो देखील आहे.
https://www.instagram.com/p/DDCplWAzVb4/?utm_source=ig_web_copy_link
वाल्मिक कराड यांची देवेंद्र फडणवीस सोबत फोटो.
https://www.instagram.com/p/DALf8OigwN0/?utm_source=ig_web_copy_link
आज मुंबई येथे आ. पंकजा ताई मुंडे यांची सदिच्छा भेट असं लिहत वाल्मिक कराडची पंकजा मुंडे सोबत फोटो पोस्ट केलाय आहे.
https://www.instagram.com/p/C-79zYHzM3Y/?utm_source=ig_web_copy_link
वाल्मिक कराड याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत फोटो.
https://www.instagram.com/p/CV40LGSJShp/?utm_source=ig_web_copy_link
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत वाल्मिक कराडचा फोटो.
https://www.instagram.com/p/CUpP7SAJZLM/?utm_source=ig_web_copy_link
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत वाल्मिक कराडची फोटो.
विशेष म्हणजे वाल्मिक कराडवर आरोप करणारे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतही त्याचे फोटो आहेत. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?