Reshma Shinde Wedding : मराठी सिनेविश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रेश्मा शिंदेच्या (Reshma Shinde) घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा घरच्या घरी पार पडला. यावेळी तिच्या हातावरच्या मेहंदीमध्ये लग्नाची तारीख स्पष्टपणे दिसली. यावरून २९ नोव्हेंबरला अभिनेत्री लग्न करणार असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता मराठमोळ्या संस्कृतीनुसार लग्नाच्या एक दिवस आधी रेश्माचा हळदी सोहळा पार पडला आहे.