Thursday, March 28, 2024

Latest Posts

येल्लो आर्मीकडे Indian Premier League चे पाचवे विजेतेपद

इंडियन प्रीमिअर लीग हा भारतातील एक जणू काही सणच आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २८ मे रोजी पार पडणार असून सामन्या आधी पाऊसाने हजेरी लावली.

इंडियन प्रीमिअर लीग हा भारतातील एक जणू काही सणच आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २८ मे रोजी पार पडणार असून सामन्या आधी पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करून ३० मी रोजी खेळवण्यात आला असून या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स या संघाने बाजी मारली. आधीच चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसके (Csk) ने यंदा म्हणजेच आयपीएल IPL 2023 मध्ये देखील विजयीपदाचा मान पटकावला आहे. हा अंतिम सोहळा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा होता. सीएसकेने विजयीची सलामी लावल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी. आयपीएलच्या ट्रॉफीसोबत संघाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्याचबरोबर सीएसकेच्या चाहत्यांनी विजेतेपद जिंकण्याचा आनंद देखील जल्लोषात साजरा केला.
चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणारा कर्णधार (Captain) महेंद्र सिंह धोनी आणि शेवटचा चौकार मारून संघाला विजेतेपद मिळवून देणारा रवींद्र जडेजा यांनी आयपीएलच्या ट्रॉफी सोबत फोटो काढला. हा आयपीएलचा सिझन रवींद्रने कॅप्टन कुल धोनी साठी समर्पित केला.
धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे सीएसकेच्या आशा संपल्या होत्या परंतु रवींद्र जडेजा याने शेवटचा चौकार मारून लगेच महेंद्रसिंह धोनीकडे धावा घेतली आणि त्याला जाऊन मिठी मारत आनंद व्यक्त केला.
आयपीएलच्या इतिहासात सीएसके हा संघ पाच वेळा चॅम्पियन ठरणार दुसरा संघ आहे. याआधीही सीएसके ने २०१०, २०११, २०१८, २०२१ या साली विजयी पदाचे नाव कोरले होते.
अंबाती रायडूचा हा आयपीएल २०२३ चा शेवटचा सामना असून त्याने सुरुवातीलाच निवृत्तीची घोषणा केली होती. रायडूचा शेवटचा सामना असल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आले होते.
या सामन्यात आधीपासूनच सर्वच फलंदाजांनी दमदार कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्याच बरोबर मुंबई इंडियन्सच्या नंतर चेन्नई सुपर किंग्स हा ५ वेळा विजेतेपद जिंकणारा दुसरा संघ ठरला आहे.

हे ही वाचा:

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ, ३० मे रोजी कुटूंबियांची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss