Devendra Fadnavis on BJP Manifesto : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील 18 विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र (BJP election manifesto 2024) तयार केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले आहे.
ज्यांच्या प्रेरणेने भारतात आम्ही काम करत आहोत असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना महाराष्ट्रात अस्तित्वात आणण्यासाठी या संकल्पपत्रातून होत आहे. संकल्प पत्र कागदाचा डॉक्युमेंट नाही. पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचं पवित्र डॉक्युमेंट आहे. आज १२ वाजता एक स्थगिती पत्र येणार आहे. या राज्यात ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस आहे, अशा लोकांचं पत्र १२ वाजता येणार आहे. पण जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, भाजपवर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
२५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. एफडीआय मध्ये ५२ टक्के महाराष्ट्राकडे आला आहे. त्यातून १० लाख विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी अग्रेसर असू.सरकारी नोकऱ्यांमधील निर्बंध गटात १ लाख पेक्षा जास्त नोकरी सरकारी क्षेत्रात दिल्या आहेत. सौर व अक्षय उर्जेचा वापर करून वीज बिलात ३० टक्क्यांवर सूट देणार आहेत. व्हिजन डॉक्युमेंट तयार करू. विज्ञानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवणार आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी प्रयत्न करणार आहोत. फिनटेक आणि एआय मध्ये मोठी गुंतवणूक करणार आहोत, असं म्हणत फडणवीसांनी व्हिजन मांडलं.
आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील १० मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात काय काय असेल याचा उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा संकल्प करण्यात आला आहे. तर मोफत वीज देण्यासाठी अगोदरच पावलं टाकल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांकडून खरेदी झाली तर फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने याविषयीचा निर्णय घेतला होता. पण आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्या वर्षी करून दाखवल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे ज्या अन्नधान्यांची हमी भावाने खरेदी होईल. बाजारात त्यांना जर योग्य किंमत मिळाली नाही तर सरकार फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
हे ही वाचा:
मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…
PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य