spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मोठी बातमी: महायुतीत मोठ्या घडामोडी,महायुतीची बैठक अचानक रद्द

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात काळजीवाहू एकनाथ शिंदेनी यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचा चित्र आपल्याला दिसला आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांची बैठक काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवास्थानी झाली. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या आणि त्यानंतर आज मुंबईत पुन्हा एकदा बैठक होणार होती. मात्र महायुतीची हि बैठक अचानकपणे रद्द करण्यात आली आहे आणि ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. मात्र ही बैठाक अचानकपणे रद्द करण्यात आली आणि पुढे ढकलण्यात आली आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान महायुतीची आज बैठक रद्द झाल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय..
काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह दिसत नव्हता आणि त्यांचे खांदे देखील पडलेले होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले होते. मात्र फोटोसेशनवेळी त्यांचा चेहरा पडलेला दिसल्यामुढे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची मोटारी लागणार आहे अशी चर्चा आहे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा कळते. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदें यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांशी बैठक घेतली. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावे,असे शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदें यांच्यासोबतच्या बैठकीत सांगितले. त्यामुळं आता नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss