spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी मनसेने ‘या’ बड्या नेत्याला दिले सभेचे निमंत्रण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची विक्रोळीमध्ये सभा होणार आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत याना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. राज ठाकरेंच्या सभेमध्ये संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. सर्वत्र प्रचाराच्या तोफा धडाडल्या आहेत. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या घोषणा करतायेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या राजकीय समीकरणं वेगळीच आखल्याचं दिसून येत आहे. महायुती सरकारला मनसेचा टेकू असणार अशा चर्चाही रंगल्या आहेत. त्यातच आता मनसेच्या सभेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या एका बड्या नेत्याला निमंत्रण दिल्याने खळबळ उडाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची विक्रोळीमध्ये सभा होणार आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत याना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. राज ठाकरेंच्या सभेमध्ये संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी दिली आहे. या खळबळजनक प्रकारामुळे मुंबईसह राज्यात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना मनसेच्या मंचावर संजय राऊत कसे येतील आणि का येतील असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने संजय राऊत यांना का निमंत्रण दिले यावर आता खल सुरु आहे.

राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी संजय राऊत यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला बोलावण्यात आल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात त्यासाठी राजकीय विचार कसे असावेत आणि विचारांची देवाण घेवाण कशी असावी यासाठी त्यांना सभेला बोलावण्यात आल्याचा चिमटा मनोज चव्हाण यांनी काढला. राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यानंतर हा वाद आता पेटला आहे. आता मनसेने संजय राऊत याना निमंत्रण देऊन मोठी खेळी खेळली आहे.

हे ही वाचा:

रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोला, उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याने संतापले

Shivtare – Jagtap यांच्यात विजयासाठी घमासान, पवारनिष्ठ संभाजीराव Purandar वर झेंडे फडकवणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss