spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या; धक्कादायक माहिती समोर

कल्याण मधून मोठी घटना समोर आली आहे. कल्याण मध्ये अशी घटना घडली आहे जि बदलापूरच्या घटनेला लाजवेल. १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या करणारा नराधमाचा नाव विशाल गवळी आहे. विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना सकाळी मिळाली. माहिती मिळताच तत्काळ शेगाव पोलिसांनी सापाळा रचून शिवाजी चौकातील एका सालूंमधून विशाल गवळीला अटक केली. आरोपी शेविंग करून आपला लूक बदलण्याच्या प्रयत्नात असतांना अर्ध्या तासापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे.

विशाल गवळी या नराधमाने १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपहरणाचा गुन्हा सोमवारी रात्री उशिरा कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेग वेगळी पथकं तयार करून मुलीचा शुद्ध घेत होते. मात्र मंगळवारी सकाळी एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृत्यदेह बापगाव परिसरात आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, या घटनेतील आरोपी शेगावमध्ये असल्याची टीप पोलिसांना मिळाली. टीप मिळताच तात्काळ शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील चौकातील एका सलून मधून शेविंग करत असताना विशाल गवळीला ताब्यात घेतलं. पुढील तपास सध्या सुरू आहे आणि आरोपीच्या पत्नीचा यात नेमका कसा सहभाग होता, याची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. नागरिकांकडून आरोपीवर काठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक माहिती समोर
या घटनेतील आणखी एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. आरोपीच्या तिसऱ्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यस्तही मदत केली होती. पटीने तिला पहिल्या दोन पत्नीसारखे सोडून देऊ नये, यासाठी तिने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मिळून मृतदेह एका रिक्षाच्या साहाय्याने भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विशाल याचे या आधी दोन लग्न झाले आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचढ विकृत असल्याचे समोर आले आहे. या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

Latest Posts

Don't Miss