Tuesday, June 6, 2023

Latest Posts

एका दिवसात राज्यात होतात ७० मुली बेपत्ता, अंबादास दानवे

राज्यामधील १८ ते २५ वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे कारण वाढत चालले आहे. मार्च महिन्यामध्ये तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यामधील १८ ते २५ वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे कारण वाढत चालले आहे. मार्च महिन्यामध्ये तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये विशेष म्हणजे रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता राजकारणामध्ये वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत असे पाहायला मिळाले. यादरम्यान राज्यामधील मुलीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावर चणारे हे राज्य आहे आणि कित्येक वर्षाच्या राज्य सरकारचे कारभारातून हे सिद्ध झाले आहे आणि राज्यामधून मुलीची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे असे अंबादास दानवे म्हणाले.

दररोज महाराष्ट्रामध्ये सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ महाराष्ट्रामधून सुमारे ५५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी २०२३ या महिन्यामध्ये १६०० मुली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये १८१० तर मार्च महिन्यामध्ये २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यामध्ये रोज बेपत्ता होणाऱ्या मुलींची आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच, महिला सुरक्षित नसतील तर ही बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामधून मुली बेपत्ता होण्याचे वाढत चालले आहे यामध्ये मार्च महिन्याची आकडेवारी पहिली असता पुण्यामध्ये २२८, नाशिक १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१, यवतमाळ ७४यूवरी बेपत्ता झाल्या आहेत.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss