spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

एका मंत्र्यासह ८ आमदार परत येणार; Aditya Thackeray यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

माझ्यासोबत ८ आमदार असून आम्ही मोठा बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो असं एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकींचा दिवस जसा जवळ आला तसं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्यांचा फोन आला होता, असं वक्तव्य केलं आहे. माझ्यासोबत ८ आमदार असून आम्ही मोठा बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो असं एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्यांचा फोन आला होता. माझ्यासह ८ आमदार असून आम्ही बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असे मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच २०१९ नंतर भाजपने ५ प्रमुख चेहरे आयात केल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका मंत्र्यासह ८ आमदार परत ठाकरे गटात येणार असल्याचं राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा मंत्री नेमका कोण? आणि त्यांच्यासोबत परत ठाकरे गटात येणारे ८ आमदार कोणते? या प्रश्नांना आता उधाण आले आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. अनेक जण पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, पण पक्ष फोडला, पक्षाचं नाव आणि चिन्हही चोरल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ते आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरतात तेही माझ्याच बाबांनी काढलेले, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली.

हे ही वाचा:

Sanjay Raut on Eknath Shinde: CM Shinde यांनी चळवळ नाही तर फक्त वळवळ केली, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

PM Modi Live: देशाला कमकुवत करण्याची एकही संधी MVA आणि Congress सोडत नाही, पंतप्रधानांचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss