Wednesday, April 24, 2024

Latest Posts

पी एमच्या खुर्चीवर नामोंची ९ वर्षे;सत्ता नसलेल्या राज्यात आता भाजपचा हैट्रिक प्लॅन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपनं ६६, जेडीएसनं १९ जागा जिंकल्या आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपनं ६६, जेडीएसनं १९ जागा जिंकल्या आहेत. १३ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अगदी तेव्हापासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरु आहे. अजुनही मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम ठेवला गेला आहे. अशातच कर्नाटकसोबतच भाजप दक्षिणेकडील राज्यांतून हद्दपार झाली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे आपल्या सरकारची ९ वर्ष साजरी करताना भाजप २०२४ लोकसभा निवडणुका समोर ठेवूनच रुपरेषा आखणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतच मोदी सरकार (Modi Government) आपल्या कारकीर्दीची ९ वर्ष पूर्ण करणार आहे. यानिमित्त भाजपकडून (BJP) देशभरात जंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपनं मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या आयोजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची रॅली, भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या ५१ जाहीर सभा आणि नामवंत व्यक्तींशी संपर्क, तसेच एक लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन भाजपकडून केलं जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून ही मोहीम 30 मेपासून सुरू होणार असून ती 30 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मोदींनी ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी मोदी ३० मे किंवा ३१ मे रोजी रॅलीला संबोधित करू शकतात. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री २९ मे रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील विविध कामगिरीवर प्रकाश टाकणार आहेत.

त्याचबरोबर आपल्या सत्तेची ९ वर्ष पूर्ण करताना भाजप सेलिब्रेशनसोबतच २०२४ च्या निवडणुकांची रुपरेषा काही असेल याचा देखी विचार करण्यात येणार आहे आणि त्याचपरीने भाजप कडून पाऊले उचलली जाणार आहे. भाजपाची येत्या लोकसभेसाठी कोणती रणनीती असणार आहे याची आखणी देखील केली जाणार आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय मंत्री माध्यमांशी संवाद साधतील. प्रत्येक लोकसभा जागेवर २५० ‘प्रतिष्ठित’ कुटुंबांशी संपर्क साधण्याचीही पक्षाची योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर कार्यक्रमांमध्ये विचारवंत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि व्यावसायिकांसह समाजातील विविध घटकांशी बैठका घेणं यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. भाजप पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे, कारण त्यांना पीएम मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. तसेच पुढील लोकसभा निवडणूक मे २०२४ मध्ये होणं अपेक्षित आहे. त्यापूर्वी यावर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकातील पराभवानंतर या वर्षी होणाऱ्या उर्वरित निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचाही भाजपचा प्रयत्न असेल.

हे ही वाचा : 

सामनाच्या अग्रलेखातून शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये कोण कोण राजकारणी दिसले एक बॅनरखाली; चर्चाना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss