spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

ठाकरे गटाला मोठा धक्का ! ३५ नेते राजीनाम्याच्या तयारीत

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा-कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला अनेक धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला खिंडर पडल्याचे दिसत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे काही नाराज माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा-कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ३५ स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचीही शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, असे शेवाळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला नेमकी काय घडणार , हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

मुंबईत खळबळजनक घटना ! भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

Sushil Karad विरूद्धच्या खटल्यात पोलीसांचा अहवाल दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss