spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

शिवसेनेतील बड्या नेत्याने केले मोठे वक्तव्य, उद्धव ठाकरे रात्री २ वाजता देश सोडून जातील…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) जोरदार मुसंडी मारली.

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) जोरदार मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आज रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिलाय.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचे भविष्य सांगितले आहे. रामदास कदम म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, असे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेईमानी केली. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्राश्चित्य उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, असा जोरदार हल्ला रामदास कदम यांनी केला.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss