Rahul Gandhi-Priyanka Gandhi in Blue : डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत क्रेंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय. तर अश्यातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सध्या जोरदार गोंधळाचे सत्र सुरू आहे. विरोधकांनी उद्योगपती अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. तर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच तापले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर विरोधकांचा कालपासून हल्लाबोल सुरू झाला आहे. तर या वक्तव्याचा निषेध म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपड्यात संसदेत दाखल झाले आहेत.
काल राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावरून मग देशभरात एकच विरोधाची लाट उसळली. आता इंडिया आघाडीने या वक्तव्याप्रकरणी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीने आंदोलन पण केले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2:00 वाजेपर्यंत तहकूब तर लोकसभा ही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निळ्या रंगाचा टीशर्ट घालून संसदेत दाखल झाले तर प्रियंका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. निळा रंग हा आंबेडकर आणि दलित विचारांचे प्रतिक मानण्यात येते. नेमका तोच धागा पकडून आम्ही या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचा संदेश दोघांनी दिला आहे.संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत अभूतपूर्व गोंधळ दिसला. सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राजधानी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात आणि महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही निळे वादळ आले आहे.
हे ही वाचा:
छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल
अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.