नाशिक जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. काही शिक्षकांची नियमबाह्य नियुक्ती करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल १०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी सेवा समिती संस्थेचे आणि महात्मा गांधी विद्या मंदीर संस्था पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्यांनी नियम बाह्यपणे मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला वेतनापोटी लाखो रुपये द्यावे लागल्याचा आरोप यामध्ये आहे. या प्रकरणात संस्थांचा माजी आरोग्यमंत्री व तत्कालीन संचालक पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे त्यांचे चिंरजीव डॉ.अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १०६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यात २२ शिक्षक देखील आहेत. सदर माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.
काय आहे हा सर्व प्रकार?
आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्या मंदीर संस्थांमध्ये कर्मचारी भरतीसाठी चुकीच्या महितीच्या आधारे प्रस्ताव तयार केले गेले होते. या प्रस्तावांना शिक्षणाधिकारी यांनी मंजुरी देखील दिली, पण शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी तक्रार दिल्यानंतर याबाबत १०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात संस्था चालक आणि प्राचार्य यांचाही समावेश आहे.
हिरे कुटुंबियांवर देखिल गुन्हा दाखल.
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळाचे अध्यक्ष पुष्पाताई हिरे, उपाध्यक्ष पंडित दगा नेरे, कोषाध्यक्ष स्मिता प्रशांत हिरे, सचिव प्रशांत हिरे, सहसचिव दीपक सूर्यवंशी, सभासद डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे या साऱ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत ही फसवणुकीची बाब समोर आली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, पहिला गुन्हा ७ शिक्षकांवर आणि १ लिपिक तर दुसऱ्या गुन्ह्यात २२ शिक्षक १० लिपिक यांचा समावेश आहे.
मंत्री दादा भुसे यांनी दिले होते आदेश
हिरे कुटुंबियांच्या असलेल्या या दोन्ही संस्थांमधील भरतीसंदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अद्वय हिरे यांनी जानेवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मंत्री दादा भुसे यांनी टक्कर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना शिवसेनेत घेतले होते.
हे ही वाचा :
THANE: ही शाखा कुणाची? ठाकरे-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांत वाद
मुंबईतील प्रदूषणासंदर्भात केतकी माटेगावकरने केली महापालिकेला विनंती,पोस्ट चर्चेत