Saturday, April 20, 2024

Latest Posts

Sanjay Raut यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. अश्यातच २ दिवसांगापूर्वी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. अश्यातच २ दिवसांगापूर्वी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यावर असताना पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना आवाहन करणे चांगलेच भोवले आहे.

खासदार संजय राऊत हे शुक्रवार दिनांक ११ मे रोजी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना म्हणाले होते की, “राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले होते.” हे आवाहन करणे संजय राऊत यांना महागात पडले आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारबद्दल अप्रिय बोलल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि ५०५ (१ )(ब) कलमा अंतर्गत पोलीस प्रति अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रात पकडले १२ हजार कोटींचे ड्रग्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Nashik, देवीच्या दर्शनाला सप्तशृंगी गडावर जाताय? तर व्हा वेळीच सावध

अकोल्यात लावली संचारबंदी, अखेर परिस्थिती नियंत्रणात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss