मध्यरात्री रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तरुण- तरुणीच्या टोळक्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. सात ते आठ जणांविरोधात गंगापूर रॉड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडचे पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी कारवाई करण्यात विलंब केल्याने यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
अधिकची माहिती अशी, रविवारी काही तरुण आणि तरुणी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ एक क्लबमधून नाईट पार्टी करून मध्याच्या नशेत धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका तरुणाने तसेच एका तरुणीने पोलिसांशी अरेरावी केली. या तरुणीचा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाला आहे.
तरुण तरुणीवर गुन्हा दाखल
पोलिसांकडून अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे (30, रा. पवननगर, सिडको), वैशाली वाघमारे (नाशिकरोड) भूमी ठाकूर (19, रा. भाभानगर), आल्तमश शेख (वडाळागाव), दोन बाऊन्सर यांच्याविरुद्ध तसेच हॉटेलचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी
पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती, मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली.
हे ही वाचा:
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.