spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

प्रचार संपायला काही तास शिल्लक, आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केला गंभीर आरोप

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे.

Aaditya Thackeray : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू होता. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांत सर्व प्रचारसभा या बंद होणार आहेत अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच एक पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

“मुंबईत मेट्रोच काम पूर्ण होण्याआधीच रंगरंगोटीच्या कामातून घोटाळा केला जातोय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “मुंबई MMRDA क्षेत्रात मेट्रोची काम सुरु आहेत. अनेक कामं पूर्ण झालेली नाहीत. मेट्रोचे जे खांब आहेत, त्यांना काम पूर्ण होण्याआधीच गर्डर लागण्याआधीच रंगवून टाकलय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. “आमचं सरकार २३ तारखेला बनल्यानंतर या सर्व घोटाळ्यांची चौकशी करुन दो दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. हे सामान्य जनतेचे पैसे आहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा पैसा जातोय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलसा.

आदित्य ठाकरे यांनी मेट्रोच्या कामावरुन एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे, सोबत इशारा सुद्धा दिलाय. “मिंधेंच्या गँगमध्ये आमचे एक-दोने जुने ओळखीचे लोक आहेत, त्यांना तिकीटं मिळालेली नाहीत ते सांगतात आम्हाला” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, तो घोटाळा महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील नगरविकास खात्याने हा घोटाळा केलाय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss