spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

मंत्रीपद दिली गेली पण ठराविक मंत्री सोडले तर कोणी काम करत नाहीत; Rohit Pawar यांचा विरोधकांवर आक्षेप

महायुतीमध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर इतर अनेक नेत्यांनी मात्र अद्याप त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यंदा महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळाले असून सरकार स्थापन होऊन महिना होत आला आहे. मात्र महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे आणि खातेवाटपामध्ये महायुतीचे अनेक नेते आहेत. महायुतीमध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर इतर अनेक नेत्यांनी मात्र अद्याप त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले की, “राज्यामध्ये सध्या बीडमधील हत्येवरुन राजकारण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करुन हत्या करण्यात आली. राज्यामध्ये बीडमधील हत्येवरून राजकारण तापले आहे. आरोप प्रत्यारोप होत नाहीत आरोपी कोण आहे कळलं आहे. अजून आरोपी पकडले आहेत अजून एक आरोपी राहिला आहे, कडक कारवाई झाली पाहिजे, परत अस कोणी करून नये अशी कारवाई करावी. तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली. सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले परत टप्प्याटप्प्याने ७० टक्के शेतकऱ्यांचे पैसे थांबले आहे. आता इलेक्शन झाल आहे. बहुमत भाजप मित्र पक्षाला मिळालं आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवतील अनेक बहिणी वंचित आहेत जे आत्ता मिळत आहेत ते कमी करतील. आम्ही विरोधात आहोत त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीसाठी भांडू.”

पुढे ते म्हणाले की,”धनंजय मुंडे यांच्या पक्षातील मोठे नेते होते. आता अजित पवारांसोबत आहेत माझ्या जवळचा आहे माझा निष्ठावंत आहे यांच्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही बीडमध्ये काही करायचं असेल तर त्याच्याशी संपर्क साधावा लागत असेल असं जर कोणी दाखवत असेल तर अनेकांचे फोटो असतील आमचे दिशाभूल झाली असेल कोणाचे फोटो कोणाबरोबर त्यावेळेस आम्ही कार्यक्रमाला गेलो तर अनेक जण फोटो काढतात. फडणवीस साहेब पवार साहेब आमच्या सोबत कोणाचे फोटो काढण्याचे लिंकिंग करणे योग्य नाही, योग्य कलम लावून योग्य कारवाई झाली पाहिजे.”

“मंत्री पद दिली गेली पण ठराविक मंत्री सोडलं तर कोणी काम करत नाहीत बरेच मंत्री नाराज आहेत. निधी नसणाऱ्या खात्याचे मंत्री केल्या असल्याचं कळत आहे, येथे असलेले खाते कशासाठी हवे होते पैसे खाण्यासाठी हवे होते का? हे पण स्पष्ट करावं, जिल्ह्याचे पालकमंत्री कशासाठी हवाय तर जिल्ह्यासाठी बजेट बघून पालकमंत्री व्हायचे आहे काय गडबड सुरू आहे कळत नाही, आजचे जनतेने तुम्हाला बहुमत दिल आहे राज्याला सुरळीत आणि चांगल्या दिशेने घेवून जायच सोडून पालकमंत्री पदासाठी भांडत बसले आहेत. आशिष देशमुख विदर्भ नागपूर मधील मोठे नेते आहेत,नामदार झाले आहेत, उगाच काही बोलणं योग्य नाही बातमी व्हावी यासाठी बोलत असतील तर माहिती नाही, असे रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले मुलाच्या खात्यावर; कुटुंबाने दाखवला प्रामाणिकपणा

विराट कोहली सतत तीच चूक करत होतोय बाद; चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त, आता निवृत्त व्हा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss