spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

कोल्हापुरात घडली चमत्कारी घटना; खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीला जीवनदान

कोल्हापुरात एक चमत्कारी घटना घडली आहे. खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीला जीवनदान मिळालाय. आजतागायत रस्त्यावरील खाड्यांमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवनदान मिळालं आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. घरी अंत्यविधीची तयारी झाली, त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते. त्या वृद्ध व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला. या वृद्ध व्यक्तीची हालचाल सुरु झाली.

कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे असं या वृद्ध व्यक्तीचा नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. एका खड्ड्याने त्यांना जीवनदान दिल. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत.

नेमकं काय घडलं?

१६ डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; मात्र डॉक्टरांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.

दरम्यान, रूग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss