spot_img
Saturday, November 30, 2024
spot_img

Latest Posts

शिवसेना नेत्यांच्या अनोख्या मागणीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट..

२८ नोव्हेंबरला महायुतीची बैठक दिल्लीत पार पडली. ती बैठक मुख्यमंत्री पदासाठी घेण्यात आली होती. मात्र अद्यापही मुख्यमंत्री पदावर कोण असणार हे या बैठकीत ठरलेलं नाही. त्यानंतर दुसऱ्यादिवशी अचानकपने बैठक रद्द करण्यात आली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी परतले. आता पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या कोणत्याही बैठक होणार नाही आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्तास्थापनेसाठी वाट बघावी लागणार आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून भाजपकडे अनोखी मागणी केली जात आहे.

गृहमंत्रीपद कोणाकडे असणार यावरून राजकारण सध्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री दिल्लीत भाजपच्या केंदीय नेते अमित शहांसह काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यामंत्री म्हणून शिक्का मोर्तब करण्यात आला. तर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली. या ऑफरवर शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री स्वीकारण्याची विनंती केली. पण आता यात मोठा ट्वीस्ट आला आहे. गृहमंत्री पदासाठी शिवसेनेची मागणी आहे आणि या मागणीवर शिवसेना ठाम आहे. त्यामुढे आता अजून सत्तास्थापनेसाठी वाट बघावी लागणार आहे.

भरत गोगावलेनी केला सवाल?
एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपद मिळणार की नाही यावर सध्या राजकारण सुरु आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटातील एका नेत्याने याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं. त्याप्रमाणे आता एकनाथ शिंदेंना जर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर त्यासोबत गृहमंत्रीपदही असावं, असं आता आम्हाला वाटतंय. मग त्यात चुकीचं काय? असा सवाल शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाशी आम्ही सर्व बांधील आहोत. मग तो निर्णय काही का असेना, असेही भरत गोगावले म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरु असताना आता उदय सामंत यांनी यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते त्यांच्या गावी विश्रांतीसाठी गेले आहे. ते उपमुख्यमंत्री व्हावेत, अशा आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच करतील, असे उदय सामंत यांनी म्हटले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?

शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss