spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

आमदार झाले म्हणून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, पेढे वाटण्यात आले; वन विभागाने केला आमदारावर गुन्हा दाखल

विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आपला यश साजरा करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून काढलेली निरवणूक आणि पेढेवाटप भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षासह आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडलं आहे. हत्तीवरून मिरवणूक काढल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याची माहिती आहे. शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर – वेल्हा – मुळशी मतदारसंघाचे शंकर मांडेकर आमदार बनल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी सांगलीवरुन हत्ती मागवला होता. मांडेकर आमदार झाले यासाठी या हत्ती वरुन पेढे वाटण्यात आले. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे, त्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जिथे आहे, त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.

सोशल मिडियावर पोस्ट
आमदार शंकर मांडेकरांनी या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील त्यांच्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे, त्याचबरोबर या मिरवणुकीसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. उरवडे – आंबेगाव – बोतरवाडी – मारणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हत्तीवरून मिरवणूक काढत प्रेम व्यक्त केले . भोर – राजगड – मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी,चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय – बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

 

Latest Posts

Don't Miss