सगळीकडे राजकीय वातावरणाची धुमाकूळ चालू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापलय पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभाराला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आले. मात्र, आम्हाला ओबीसीकडून आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार आहोत असं त्यांनी म्हंटलं होत. तसेच जिथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तिथेच उमेदवार देणार, जिथे शक्यता नाही तिथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवार्यांच्या पाठीशी उभे राहा असे त्यांनी स्पष्ट केले होते.
मनोज जरांगे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा, मुस्लिम आमी दलित समाजाची मोट बांधण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली. निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांची पुढची रणनीती काय असणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, आता त्यांची रणनीती स्पष्ट होताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जुनी खेळीचा डाव आखला आहे. त्यांनी आज दि. १० नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये महत्त्वाची घोषणा केली आहे. आजपासून आमच्या पुढील आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे, कोणी येऊ द्या…आम्ही उभे आहोत… मस्तीत यायचे नाही… गुर्मीत वागायचे नाही, हा मराठा तुम्हाला लढून गुडघ्यावर टेकवणारा होणार आहे. मराठ्यांना हरवण्याची ताकद कोणातही नाही, तुमचा गेम करणार आहोत. पुन्हा आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. मी माझ्या समाजाला न्याय देईल असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या या उपोषणाच्या भूमिकेमुळे आता सरकारची डोकेदुखी नक्की वाढू शकते.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेलं याचा हिशोब द्या, Rohit Pawar यांचा Amit Shah यांना सवाल
सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटनेते सुनील टिंगरे यांच्यावर साधला निशाणा, ईडीच्या नोटीसवरूनही शरद पवार…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.