सगळीकडे राजकीय वातावरणाची धुमाकूळ चालू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापलय पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याचा संकल्पपत्र असे दिले आहे. या संकल्पपात्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
भाजपच्या या जाहीरनाम्याच्यावेळी भाजपचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाखाली १८ विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र तयार केले आहे. जो संकल्प करतोय तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न सहा हजार रुपयांनी कमी झाले होते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आहे तरी काय?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
- लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये लागू होणार
- प्रत्येक गरिबाला अन्न निवाऱ्याचे नियोजन
- वृद्ध पेन्शन योजनेत डिड हजार वरून आता २१०० रुपये करणार
- शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना
- २५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
- १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार, विद्यावेतन माध्यमातून अग्रेसर असणार
- गरीब आणि मध्यम वर्गीयांना सौर व अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न
- एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी
- फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल
- शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न
- २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न
- महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार
- महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
हे ही वाचा:
धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंनी केला संतप्त सवाल, महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा?
तुम्हाला जर तुमचा चेहरा चमकदार करायचा असेल आणि वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही महिनाभर खा ‘हे’ फळ
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.