spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वक्त्यव्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत शंका निर्माण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाली आहे. बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यामोर्च्यात विविध पक्षांचे नेते देखील सहभागी झाले होते. त्या मोर्च्यात वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजनामा द्या, अशी मागणी विरोधकांकडून केली गेली आहे. आता त्यांच्याच पक्षाने मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वक्त्यव्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारची कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपद टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येचे सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत असल्यामुळे धंनजय मुंडे यांचे मंत्री पद धोक्यात असल्याची चर्चा आहे.

नांदेड मध्ये सोमवारी खंडोबाच्या मालेगावचे दर्शन घेण्याकरिता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गेले होते. त्यांनतर त्यांनी मालेगाव यात्रेमध्ये त्यांनी फेरफटका मारला तसेच घोड्या व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या बाबत जी पक्षाची भूमिका राहील ती पक्षाची भूमिका , अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य राहील, असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले.

वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण जातील
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस उलटून गेल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून तपास करत आहेत. आतापर्यंत वाल्मीक कराड यांच्या अनेक निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मीक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण जातील, अशी चर्चा आहे. वाल्मीक कराड हे सध्या महाराष्ट्रात की राज्याबाहेर आहेत, याबाबत माहिती नाही. त्यामुळे कराड आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सीआयडीला शरण जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss