Aaditya Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) निर्धार शिबिर ईशान्य मुंबईतील कालिदास नाट्यगृहात पार पडले. या शिबिरात ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला. जुने भाजपवाले अजूनही सांगतात की आपलं सरकार आलं कसं? असे म्हणत त्यांनी भाजपवरही (BJP) निशाणा साधला. तसेच लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) यश आणि विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पराभवावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले आहे.
लोकसभेत आपलं यश आपण मानतो. त्यानंतर पदवीदर आणि सिनेट निवडणूक आपण जिंकलो. विधानसभा निवडणुकीत वोटर फ्रॉड झाला तो आपण समोर आणत आहोत. इथून पुढे मुंबई, ठाणे, नागपूरला जाऊन लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. २०२२ ला या गद्दारांनी सरकार पाडलं. त्यावेळी त्यांनी सरकार बनवलं पण आता सरकार त्यांच आलंय, हा विश्वासच त्यांना बसत नाही. अजूनही जुने भाजपवाले सांगतात की आपलं सरकार आलं कसं? वाजपेयी साहेबांच्या काळातील नेते सांगतात. या नेत्यांना शॉक बसला की सरकार आलं कसं? आताचे भाजपवाले आहेत ते कॉन्ट्रॅक्टवाले भाजपवाले राहिलेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केला.
मुंबईला आपल्या शिवसेनेचा महापौर का हवाय? ते मी सांगतो. रस्ता घोटाळा एवढा सुरु आहे. त्याबद्दल वारंवार मी बोलत आलो आहे. BMC एवढे रस्ते खोदत आहेत की त्यांना काहीतरी मिळणार आहे म्हणून ते रस्ते खोदत आहेत. त्यांचे सरकार आले आणि म्हणायला लागले आम्ही मुंबईला खड्डे मुक्त करू. अजून खड्डे मुक्त मुंबई झाली नाही. यांच पद गेलं, पण मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली.
Shivsena UBT: मराठीचा अपमान,औरंगजेबाचा गौरव वाढत्या ढोंगाची निर्मिती; ठाकरे गटाकडून टीकाFollow Us