राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच सर्व राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.अश्यातच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ठाकरे आणि पवार कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करत पक्षफुटीला घराणेशाही कारणीभूत असल्याचे सांगितले. यावरून आता शिवसेना उबाठा आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी चांगलीच तोफ डागली आहे.
आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, “बीसीसीआयचा अध्यक्ष पद कोणाला दिला हे पहिले त्यांनी सांगावं. जर कोणत्या क्रिकेटरला बीसीसीआयचे अध्यक्षपद दिल असते तर आता चांगला झालं असतं. परंतु या ठिकाणाहून सगळं पळवायचं, हे फक्त भाजपाला माहिती आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा पक्षा तोडला फोडला आणि चोरून नेला त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं? भाजपाने आता याचे उत्तर द्याव की महाराष्ट्रातील पाच हजार तरुणांच्या नोकऱ्या आता गुजरातला का घेऊन गेल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “मी कधी भाजप वरती वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही आमच्या स्वतःसाठी लढत आहोत आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत त्याच ठिकाणी भाजप वाले गुजरातच्या लोकांसाठी काम करत आहेत. मनसेला भाजपाने पाठिंबा दिलेला आहे. ज्या भाजपने गुजरात च्या घश्यात नोकऱ्या घातल्या.”
भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना ते म्हणाले, “२०१४ च्या जाहीरनामा पहा. त्यानंतर पहा त्यांनी जाहीरनामा मध्ये केलेल्या किती गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत? महिलांना आधार देणे गरजेचे आहे तुम्ही पाहिला असेल तर आपण त्या योजनेमध्ये अजून वाढवून ही योजना दिलेली आहे. आपण फक्त पंधराशे रुपये दिले नाही तर या ठिकाणी प्रवास आणि बाकीच्या गोष्टी देखील या ठिकाणी देण्याचा वचन दिलेल आहे. महिला ज्या ठिकाणी घर चालवतात समाज चालवतात त्यांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. १५ लाख रुपये देणार होते पण त्यांनी पंधराशे रुपये वरती आणला. एकनाथ शिंदे यांना बहीण तेव्हा नाही आठवली ज्यावेळी बिल्किस बानोचा रेप झाला आणि त्यांच्या लोकांना या ठिकाणी पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…