spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Aaditya Thackeray : कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे – आदित्य ठाकरे यांचे प्रसारमाध्यमांना उत्तर

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण दिल्लीत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचे टाळले आहे. कोणी कोणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांचे आम्ही कौतुक करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

Aaditya Thackeray: मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (ता. ११ फेब्रुवारी) हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण दिल्लीत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचे टाळले आहे. कोणी कोणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांचे आम्ही कौतुक करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये आहेत. काल रात्री त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. आज दिल्लीत आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं, त्या बद्दल विचारलं. त्यावर “कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे. राऊत साहेबांनी काल यावर उत्तर दिलय. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाही, महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याच पाप केलं. त्यांनी दिलेल नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते, ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केलं” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात निवडणूक आयोगाचं बहुमताचं सरकार आहे. त्यात भाजप घटक पक्ष आहे. मिंधे गट आहे आणि फुटलेली राष्ट्रवादी आहे. तिन्ही पक्षांनी मिळून आमचा पक्ष फोडला.ठीके ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घ्या. ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना घ्या. पण जनतेच्या प्रश्नावर काही काम करणार का? राज्यात वाद काय, तर मुख्यमंत्री कोण होणार? पालकमंत्री कोण होणार? विस्तार कधी होणार? असे वाद सुरू होते. जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते, दिले का? लाडक्या भावाचे १० हजार दिले का?” असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारले.

पुढे शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला खासदार संजय दीना पाटील उपस्थित होते, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “ते उपस्थित असतील, पण ते कोणासाठी गेले होते तर ते शरद पवारांसाठी गेले असतील” पुढे त्यांना शरद पवारांना भेटणार का? म्हणून विचारलं. त्यावर ‘आज भेटणार नाही’ असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले. “महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत एक साम्य आहे. जे कोणी जिंकलं आहे, त्यात आयोगाचा मोठा हात आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानताना भाजपच्यावतीने आम्ही ही चर्चा करतोय, निवडणुकीत फ्रॉड झालं आहे. ते जगासमोर आणणं गरजेचं आहे. निवडणूक निपक्षपातीपणे होतात का, याचं उत्तर आयोगाने द्यावं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राज्यभरातील नेते भेटत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ही यंत्रणा फ्रि आणि फेयर वाटत नाही” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.“जे पळून जात आहेत, ते जय महाराष्ट्र करत नाहीत, जय गुजरात करत जात आहेत. चौकशीला घाबरून जात आहेत. त्यामुळे ते जय महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत. आम्ही मागच्या महिन्यात शरद पवारांना भेटलो. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो. आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो, ते कशासाठी भेटलो ते समोर आहे. आम्ही त्यांचं कौतुक केलं नाही. आम्ही विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचं कधीच कौतुक करणार नाही” असं आदित्य ठाकरे म्हणाले. ईव्हीएमबाबत अनेक पक्षाची वेगळी मते आहेत. आम्ही जिंकलो आणि हरलो तरी आमचं मत ठाम आहे. निवडणुकीत आमचं मत कुठे जातं, ते आयोगाने स्पष्ट करावं. रिकाऊंटही आयोग देत नाही. मॉकपोल घ्या म्हणून सांगितलं जातं. ईव्हीएमबाबत अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे. व्हीव्हीपॅटमधील मतांची पावती खाली पडते का?. महाराष्ट्रात मतदान कसं वाढलं? हे सांगा. मतदानाच्या शेवटच्या वेळेत टोकन दिलं जातं. मतदारांना किती टोकन दिलं हे आयोगाने सांगा” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेत.

हे ही वाचा:

Rajan Salvi Resigned: ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या राजन साळवींचा राजीनामा: उद्धव ठाकरेंना रामराम

Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss