राज्यात नव्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेऊन आठवडा लोटला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याचं समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी जाणार आहे. आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
अधिवेशन संपल्यावर 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री, खातेवाटपाचं पत्र राजभवनला पाठवतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील, असं सांगण्यात येत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीचे अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याचे एकाच चर्चा आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही, असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे.
अधिवेशनात नवीन आमदारांना बोलण्याची संधीही मिळाली नाही- विकास ठकरे
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन परंपरेने विदर्भात पार पडते. मात्र, विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्या पुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे विदर्भातील आमदारांमध्ये नाराजी आणि निराशेची भावना आहे. गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होत दोन ते तीन आठवड्यापर्यंत मर्यादित होता. यंदा मात्र नुकतेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवडाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित वाव मिळू शकलेलं नसल्याचं मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असताना पुढच्या वेळी हिवाळी अधिवेशन जास्त कालावधीचा होईल अशी अपेक्षा ही आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.. यंदा प्रश्नोत्तरांचा तास तसेच लक्षवेधी सूचनाची संधी नसल्यामुळे अनेक आमदारांना खास करून नवीन आमदारांना या अधिवेशनात बोलण्याची संधीही मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule