पुण्यातील स्वारगेट येथील तरुणीच्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतानाच जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे. काही टवाळखोर पोरांनी ही छेड काढण्यात आली आहे. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. रविवारी हे प्रकरण सावर आल्यांनतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण सात आरोपी आल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी चार पोलिसांनी अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.
मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दुसरा गुन्हा मुलींची छेड काढल्या प्रकरणात होता. या प्रकरणात अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी किरण माळी हा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी अनिकेत भोई हा या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी मारहाणीसह वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
हे ही वाचा:
Oscar 2025 : ‘या’ चित्रपटांना मिळणार सर्वोत्कृष्ट पुरस्कार; वाचा सविस्तर बातमी
BMC चा पेपर फुटला? पेपरफुटी घोटाळा Raj Thackeray यांच्या कोर्टात जाणार