बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातले सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराड हा स्वतः शरणात पोलिसांच्या शरणात आला. त्याला मंगळवारी उशिरानं झालेल्या सुनावणीत १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सीआयडी आज पासून वाल्मिक कराडची चौकशी करण्याची सुरवात केली आहे.
बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी केला जात आहे. एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जात आहे. प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलावलं आहे.
जलसमाधी आंदोलन
तर आज मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गावकर्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केला आहे. संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांची आहे. या जलसमाधी आंदोलनात तीन महिलांना चक्क आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून इतर आंदोलकांना बाहेर येण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मात्र गावकरी आंदोलनावर ठाम आहेत. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षकही आंदोलनस्थळी दाखल झाले असून आरोपींना कधी पकडणार याची तारीख सांगा असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका