Saturday, April 20, 2024

Latest Posts

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले खुले आवाहन

शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत फूट पडली. आणि शिवसेना दोन गटांत विभागली गेली. एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या उधाण यायला सुरुवात झाली. तर अनेकदा खुली आव्हानही देण्यात आली आहे.

शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत फूट पडली. आणि शिवसेना दोन गटांत विभागली गेली. एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या उधाण यायला सुरुवात झाली. तर अनेकदा खुली आव्हानही देण्यात आली आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य आठाकरे यांनी एकनाथ शिंदे याना खुले आवाहन दिले आहे, आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान दिलं आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे. जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.

त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे. आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्राचे १३ खासदार आणि ४० आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

वरळीमध्ये निवडणुका होऊ द्या, मग कळेल कोणाचा पोपट मेला आहे’ असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर बोलतांना आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय.आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आधी माझ्यासमोर निवडणुकीसाठी उभं करा, मी आज राजीनामा देतो. असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं आहे.ठाकरे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात कुठेही दंगली घडल्या नव्हत्या. परंतु शिंदे सरकारच्या काळात अनेक ठिकाणी दंगली घडत आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दंगली घडवल्या जात आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट वरळीतून उभं राहण्याचं चॅलेंज दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला त्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे ही वाचा : 

आशिष देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या आयोजित स्क्रीनिंगमुळे पुण्यामधील विद्यार्थी आक्रोश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss