सध्याचे वातावरण बघता शेतकऱ्यांसाठी आणि पिकांसाठी हे असे वातावरण योग्य नाही. त्यामुळे शेतकरी अजूनच हतबल झालेला दिसतो. या महासंकटात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. कांदा, टोमॅटोच्या नुकसानाची शासन दरबारी दखलसुद्धा घेतली जात नाही. हीच परिस्थिती आज निफाड तालुक्यातील भेंडाळी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना समोर आली. माझ्या बळीराजाचं हे दुःख बोलून मोकळं होण्याइतकं सोपं नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारला विचारला आहे. राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर छत्रपती संभाजी नगरमध्ये त्यांनी काल दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळी पाहणी दौरा करण्याकरता पोहोचले. नाशिकच्या परिसरातील शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची (Nashik Rain) आवश्यकता आहे. अनेक ठिकाणची पिके पावसाअभावी जळून गेली आहे, उरले सुरले पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळल आहे. अशा संकटकाळात बळीराजाला मजबूत पाठबळ हवंय आणि आम्ही ते देणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज सकाळपासून दौऱ्याला सुरवात केली. यात सुरवातीला निफाड (Niphad) तालुक्यातील भेंडाळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याबाबत शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी विनंती केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आपण पहातोय की पाऊस नसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बोलून मोकळं व्हायचं अशी भूमिका घेत आहेत, पण जनतेचे पण कान उघडे आहेत, मग शेजारच्या लोकांनी माईक चालु असल्याचे सांगत, जास्त बोलू नका’ असा सल्ला दिला. ही जी वृत्ती आहे ना, की आपल्याला जो मोठे करतो, आपल्यासोबत राहून सगळं काही देतो, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून निघून जायचं, ही वृत्ती जनतेने ठेचून काढली पाहिजे, पण घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असही ठाकरे यावेळी म्हणाले. राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी काल दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळी पाहणी दौरा करण्याकरता पोहोचले. नाशिकच्या परिसरातील शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सकाळी ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील भेंडाळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची पाहणी केली. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील भात पिकांसह टोमॅटो पिकाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
पर्यटन मंत्री गिरिश महाजनांनी केली मोठी घोषणा
भारतात पुन्हा परदेशातून येणार चित्ते