Friday, March 29, 2024

Latest Posts

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ने समन्स पाठवले होतं. या संदर्भात जयंत पाटील हे काल दिनांक २२ मे रोजी ईडी कार्यलयात उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ने समन्स पाठवले होतं. या संदर्भात जयंत पाटील हे काल दिनांक २२ मे रोजी ईडी कार्यलयात उपस्थित होते. सकाळी ११ वाजता जयंत पाटील हे ईडी कार्यलयात पोहचले. आणि तब्बल ९ तास जयंत पाटील यांची चौकशी ही सुरु होती. या ९ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील हे ईडी कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली आहे. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे.

यावेळी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, “तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. तुम्ही थांबलात तुमचे आभार. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, “आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या कंत्राटांशी माझा कधीही संबंध आला नाही. पुन्हा जेव्हा बोलवण्यात येईल, तेव्हा चौकशीला येणार असल्याचं ईडीला सांगितलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की, “प्रमुख नेत्यांना महत्वाची काम असून, ते पक्षकार्यात गुंतलेले असतात. पण, सर्वांना माहिती की जयंत पाटील स्वच्छ असून, चौकशीनंतर बाहेर येतील. याची खात्री आणि माझ्यावर विश्वास असल्याने कोणीही मुंबईत उपस्थित राहिले नाहीत.”

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. जयंत पाटील याना जी पहिली नोटीस पाठवण्यात आली त्या दिवशी नेमका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. या सर्व पार्श्वभूमीवर काल जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसेच जयंत पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तसेच संपूर्ण राज्यात देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे असा आरोप करत राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहे. तर पुणे, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात देखील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली आहे. तर ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. तसेच ‘जवाब दो मोदी सरकार जवाब दो’ असे फलक आंदोलनाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss