आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप देखील केला आहे. अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलाय.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
बीड जिल्ह्यातील विकास कामांसाठी पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये नियोजन समितीची बैठक घेतली . या बैठकीत बीडचा नगरपालिकेत एमएससीबीचा थकबाकीवरील दोन वर्षात जे बोगस बिल उचलण्यात आले त्याचा लेखी तपशील अजित पवारांकडे दिल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. आता बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनीच सांगितलंय वाल्मीक कराड माझं निकटवर्ती आहेत .त्यामुळेच त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली .मी पहिला दिवशी पासून मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करतोय .अंजली दमानिया पुरावा असल्याशिवाय बोलत नाहीत . वाल्मिक कराड मोठा नाही .त्याच्यावर वरदहस्त होता .त्यांना कोण भेटले कोणी संरक्षण दिले ? याबाबत मी पत्रदेखील दिले आहे, असे क्षीरसागर म्हणाले.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
Konkan Hearted Girl अंकिता प्रभू वालावलकरने नवऱ्यासह Raj Thackeray ना दिले लग्नाचे खास आमंत्रण