Saturday, June 3, 2023

Latest Posts

कर्नाटकाच्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट करून केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी कर्नाटकमधील विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन केले आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी कर्नाटकमधील विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन केले आहे. “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केले आहे.तसेच, “कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असेही ते म्हणाले आहेत.कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे, पण सत्तेत आलेल्या काँग्रेसला एक सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत काँग्रसचं अभिनंदन केलं आहे. “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचं अभिनंदन.

जनतेच्या इच्छा-अकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या काँग्रेसला शुभेच्छा,” असं ट्विट PM मोदींनी केलं आहे.दरम्यान, कर्नाटकातील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची होती कारण सत्ता राखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. प्रामुख्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत होती. यामध्ये निवडणुकोत्तर चाचण्यांमधून ती अंदाज वर्तवण्यात आले होते. काहींमध्ये मते काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, तर काहींच्यामते काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिलं पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही. तर काही चाचण्यांनुसार त्रिशंकू विधानसभा निर्माण होईल आणि यामध्ये जेडीएस किंग मेकर ठरेल असंही भाकीत करण्यात आलं होतं.दक्षिणेतलं मोठं आणि एकमेव राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान मोदींनी स्वतः इथं २० हून अधिक जाहीर सभा घेतल्या, रोड शो केले. बजरंग बली, द केरला स्टोरी हे मुद्दे जाणीवपूर्णक भाजपनं प्रचारात आणले. पण याचा काहीही उपयोग झाला नाही आणि भाजपला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं.

हे ही वाचा:

भाजपच्या पराभवावर ठाकरेंची जळजळीत प्रतिकिया

शरद पवार live : मोदी है तो मुमकिन है’ याला जनतेने नाकारलं आहे हे भाजपने समजून घेतले पाहिजे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss