Monday, June 5, 2023

Latest Posts

अडीच वर्ष पुस्तके वाचल्याने तरलो, भुजबळांनी सांगितला तुरुंगातील अनुभव

सध्याच्या काळात वाचन थोडं कमी झालं होतं, मात्र मायबाप सरकारच्या कृपेमुळे अडीच वर्षे अनेक पुस्तके वाचायची संधी मिळाली. माझ्या अडीच वर्षांच्या अडचणीच्या कालावधीत पुस्तकांनी मला तारुन नेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

सध्याच्या काळात वाचन थोडं कमी झालं होतं, मात्र मायबाप सरकारच्या कृपेमुळे अडीच वर्षे अनेक पुस्तके वाचायची संधी मिळाली. माझ्या अडीच वर्षांच्या अडचणीच्या कालावधीत पुस्तकांनी मला तारुन नेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. या कालावधीत अनेक पुस्तके वाचली, त्या पुस्तक वाचनामुळे आज पुस्तक वाचनाची गोडी लागल्याचे भुजबळ केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. लेखकांना लेखक म्हणून पुढे आणण्याचे काम प्रकाशक करतात. हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा अतिशय महत्वाचा दुवा असून पुस्तकं ही समाज घडवण्याचे अतिशय मौलिक काम करतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. विद्वान, लेखक, विचारवंत यांची परंपरा नाशिक शहराला लाभली असून कुसुमाग्रज, कानेटकरांनी मराठी साहित्य विश्वाला वेगळ्या उंचीवर नेले असे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्यातून समाजाची सत्य परिस्थितीत समाजासमोर येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचाल तर वाचाल असं म्हटलं आहे. ते अतिशय खरं असून वाचन करणं अतिशय महत्त्वाचे आहे. महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात समाजाच्या विरुद्ध जाणारी जी मत धाडसीपणे मांडली ती गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीयरत्न या सारख्या पुस्तकांतून पुढे आली. सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके आणि साहित्य सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.

त्यावेळच्या मायबाप सरकारमुळे अडीच वर्ष जेलमध्ये होतो. आता जेल म्हटलं की सामान्य जनतेत एक वेगळी भावना असते. मात्र त्या अडीच वर्षात हरएक पुस्तक वाचून काढले. माझ्या सुनबाई नेहमीच अनेक पुस्तके आणून देत. त्यामुळे अडीच वर्ष अनेक पुस्तके वाचली. त्यामुळे या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडलो, एकूणच मला पुस्तकांनी वाचवल्याचे छगन भुजबळांनी सांगितले.

हे ही वाचा : 

दोहा डायमंड लीग जिंकून नीरज चोप्रा जागतिक आघाडीवर

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss